तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा, असं आव्हान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकरांनी राज ठाकरेंना केलंय. यावेळी त्यांनी दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असं वादग्रस्त विधान केलंय. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
#SujatAmbedkar #RajThackeray #AmitThackeray #Sakal #RajThackeraySon #AdityaThackeray #UddhavThackeray #MNS #Shivsena #BreakingNews